सोमवार, १४ डिसेंबर, २००९

आत्मपरीक्षण - एक गुप्त अहवाल

आमचे एफबीआयचे खाते भलतेच नाणावलेले आहे. ऑर्कूटवरचे फेक प्रोफाईल पकडणा-या पथकाचा मी प्रमुख होतो. सध्या माझी बदली गुप्तवार्ता विभागात झालेली आहे. ग्लोबलायझेशन मुळे आमच्यावर कामाचा ताण वाढलाय. भारत नामक देशांत सीबीआय नावाची एक तपासयंत्रणा आहे. ही यंत्रणा पुरावे नष्ट करण्याचे काम करते. गुन्हेगाराला वाचवण्यासाठी ही यंत्रणा जगामधे अव्वल मानली जाते. आमचे काम मात्र त्याला पकडणे हेच झालेय...!!

भारतात राजकीय, सामाजिक प्रवाह, अंतर्प्रवाह आणि सुप्तप्रवाह नेहमीच वेगवेगळ्या डोंगरउतारावरून वाहत असतात. या प्रवाहांनी त्सुनामी आणू नये म्हणून तेथील दक्ष असते. सध्या आम्हाला अशाच क्षेत्रातील गुप्तवार्ता काढण्याचे काम सोपवलेले आहे. तपासादरम्यान आम्हाला असे आढळून आले कि या राजकिय आणि सामाजिक उतारांवरती आत्मचिंतन नावाची एक भयंकर उलथापालथ चालू आहे.

आमच्या पर्तिनिधीच्या अहवालातील काही भाग आम्ही इथे फोडत आहोत.. ( आदेशावरून !!)

पुढे वाचा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा